PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 8, 2024   

PostImage

सावधान गडचिरोली शहरातील मुख्य बसस्थानकावर चोरीचे प्रमाण वाढले पोलिस उप …


 

 

 गडचिरोली मुख्य बस स्थानकावरून चोरी गेलेल्या मोबाईलची अवघ्या दोन तासात लावला शोध

 

  काहि बस कर्मचाऱ्याकडून गडचिरोली स्थानिक बस टॉप मधिल सीसीटिवी कॅमेरे बंद असल्याचे कळाले

 

दिंनाक : 05/09/2024

 

गडचिरोली: गडचिरोली शहरातील मुख्य बसस्थानकावरून दूपारी 3 वाजता ललिता किशोर बोटकेवार रा. नागपूर, नागपूर बस मध्ये चळतांना त्यांच्या लक्षात आलं की त्यांची पर्स चोरीला गेली आहे.लगेच गडचिरोली पोलीस स्टेशन गाठून उप निरीक्षक दिपक चव्हाण यांना माहिती दिली असता लगेच त्यांच्या टिमने चौकशी करून अवघ्या दोन तासात मोबाईल चा शोध लावला.

 

सदर बातमी या प्रमाणे आहे कि ललिता किशोर बोटकेवार रा. नागपूर हि महिला काहि कामानिमित्त मूल ता सावली येथे बुधवार ला गेली व गुरूवार ला आपल काम आटोपून सदर महिला सावली वरून गडचिरोली बस स्थानकावर दूपारला 2 च्या दरम्यान पोचली असता नागपूर बस हि 3 च्या दरम्यान नागपूर बस मध्ये बसली असता तिकिट काढण्यासाठी बॅग मध्ये पर्स बघित असतानां त्यांच्या लक्षात आल कि पर्स चोरीला गेली आहे त्या पर्स मध्ये मोबाईल व काही पैसे होते.लगेच बस स्थानकातील चौकशी विभाग येथे माहिती दिली असता त्यांनी त्या प्रवासीला कुठल्याही प्रकारची सहकार्य न करत तूमची वस्तू चोरी झाली तर आम्ही काय करू? हे तर दरोजचेच आहे अस मनून हाथ वर केले.

 

हि घटना युवा मराठा न्यूज गडचिरोली जिल्हा अध्यक्ष सूरज गुंडमवार यांना माहिती मिळतांच लगेच त्या महिलेला स्थानीक पोलिस स्टेशन गडचिरोली येथे जावून पोलिस उपनिरीक्षक दिपक चव्हाण यांना माहिती दिली लगेच उपनिरीक्षक साहेब व त्यांच्या टिम ने चौकशी सूरू केली व लोकेशन ट्रेस करून अवघ्या दोन तासामध्ये त्या चोरी गेलेल्या पर्स चा शोध लावून त्या महिलेला वापस दिले त्या महिलेने उपनिरीक्षक दिपक चव्हाण व त्यांच्या टिम चे आभार मानले.

 

यावेळी पुढिल तपास उपनिरीक्षक दिपक चव्हाण,पोलिस हवालदार मेश्राम ,बेसरा,पोलिस नाईक,चौधरी,पोलिस शिपाई गवडकर ,हिचामी ,पूरी,खोब्रागडे करित आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 19, 2024   

PostImage

कुऱ्हाडीने वार करून केले गंभीर जखमी


 कोरची : शहरातील एकाच वॉर्डातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने शेजारच्या दुसऱ्या व्यक्तीवर कुऱ्हाडीने वार केला. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यातील जखमीच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.

 

दामुराम बैसाखू हिडामी (५०) असे जखमीचे तर निल्पा मडावी (२८) असे कुन्हाडीने वार करणाऱ्याचे नाव आहे. शनिवारी दुपारी दारूच्या नशेत असलेला कोटरा गावातील एक व्यक्ती दामुराम हिडामी यांच्या घराच्यासमोर बसून होता. त्याच्याशी निल्पा मडावी हा भांडत होता. दरम्यान भांडण इथे नका करू आपल्या घरी जाऊन करा, असे दामुराम हिडामी यांनी दोघांनाही टोकले यावरून दामराम त निल्पा

 

यांच्यात शाब्दिक बाचाबाची व धक्काबुकी झाली. मात्र, काही वेळांनी भांडण मिटले. दोघेही आपापल्या घरी निघून गेले. सायंकाळी पुन्हा निल्पा मडावी हा दारू पिऊन आला. त्याने दामुरामसोबत भांडण सुरू केले. दामुराम हा खाटेवर झोपलेला असताना निल्पाने दामुरामवर कुऱ्हाडीने हाताच्या मनगटावर वार केला. यात मनगट हातापासून वेगळे होण्यास काहीच भाग शिल्लक आहे.

 

स्थानिक नागरिकांनी दामुरामला तत्काळ कोरची ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबतची तक्रार कोरची पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. निल्पा मडावी हा फरार आहे 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 17, 2024   

PostImage

हातपाय धुवायला गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू


 एटापल्लीः आईवडिलांसोबत शेतात कामासाठी गेलेला मुलगा हातपाय धुण्यासाठी विहिरीवर गेला व पाय घसरून पडल्याने बुडून मृत्युमुखी पडला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी डुम्मे गावात घडली.

 

निखिल सदाशिव दुर्वा (१७) असे मृत मुलाचे नाव आहे. तो दहावी उत्तीर्ण आहे. डुम्मे गावात आईवडील व भावासमवेत तो राहायचा. १५ ऑगस्टला स्वतःच्या शेतात धान

 

रोवणीचे काम सुरू होते. त्यासाठी तो गेला होता. दुपारी २ वाजता जेवणाची वेळ झाली. हातपाय धुण्यासाठी निखिल हा विहिरीवर गेला, यावेळी पाय घसरून तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला. बराचवेळ होऊनही निखिल न आल्याने आई विहिरीजवळ गेली असता तिला त्याची चप्पल दिसली.

 

 


PostImage

P10NEWS

Aug. 15, 2024   

PostImage

गडचिरोली जिले में कुरखेडा तहसील के चिखली गाव के नवयुवक …



     CRIME MURDER:  गडचिरोली जिले में कुरखेडा तहसील के चिखली गाव के नामे जितेश युवक की हत्या हुई, कुरखेडा तहसील के पोलिस अंमलदार ने घरवालों के तक्रार के बावजुद कोई कारवाई नहीं की गई इसलिए घरवालों CBI द्वारा चौकशी की गयी मांग.                

     

     गडचिरोली/13:-   गडचिरोली जिला आदिवासी  और नक्षलवादी से प्रभावित जिला है, कुरखेडा तहसील अतिदुर्गम भाग है, यहा के पास ही में चिखली गाव में नामे- जितेश भजनदास पगडवार उम्र 28 वर्षे ,  घर में मॉ-बाप और एक बडा भाई, भाभी ऐसा छोटासा परिवार था, भवनदास साहेबदास पगडवार उम्र 54 वर्षे (पिता), पुष्पाबाई भवनदास पगडवार वय 48 वर्षे ,  मिथुन उम्र 31 वर्षे, भाभी निलम उम्र 24 वर्षे, ऐसा छोटासा परिवार था! दिनांक08/08/2024 रोज सुबह को जितेश गाव में घुमकर घर आया, और उसका मोबाईल में कुछ बिघाड होने कारण वो अपने पिताजी से 3000/- रुपये लेकर कुरखेडा के लिये घर से निकला, लेकीन मोबाईल दुरुस्ती नही होने के कारण वो कुरखेडा तहसील से अपने घर को वापस आ गया! फिर वह दोपहर को 2:00 बजे के समय मेरे समक्ष जंगल में नंदु लिल्लारे के साथ रानभाजी सात्या लाने के लिये नंदु के मोटारसायकल से गया! उस वक्त दिनभर में घर को टि. व्ही. देख रहा था, शाम होने को आयी लेकीन जितेश घर नहीं आने के कारण में नंदु लिल्लारे इनके घर में पुछताच करने गया, तो उनके घर में कोई नही था, घर में टाला लगाकर था, फिर में भवनदास पगडवार (पिता) घर में वापस आ गया, मेरा बडा बेटा मिथुन घर में रात 08:00 बजे तक काम व्यस्त था, रात सब घर के सो गये, उसके बाद 09/08/2024 को रात में अंदाजे 01.59 में बडे लडको को गाव के पोलिस पाटील नामे पोर्णिमा सोनटक्के,ने कॉल करके बताया की तुम्हारा भाई जितेश चिखली गाव के वडेगाव रोड पे जखमी अवस्था में पडा है, ऐसा पोलिस पाटील के कहने पर मेरा बडा लडका मुझे जगाकर पोलिस पाटील के घर गया, मिथुन के साथ चाचा लडका कोमल हरिदास बसीना गया, तब मेरा छोटा लडका जितेश शेगाव रस्ते पे चिखली गाव से 60 ते 70 कि. मीटर पे जखमी अवस्था में पडा था, उसके सिर, पिठ और मनके पे धारदार शस्त्र से वार किया गया, उसकी हत्या के आठ दिन पहिले चिखली गाव के अमन्न मुन्ना पठाण, व जितु गुल्लु  पासोरे, ये दोनो मेरे घर आकर मेरे छोटे लडके के ऊपर मोबाईल चोरी का आरोप करके तुम्हे काटकर फेक देंगे ऐसी धमकी देकर चले गये,
 कुरखेडा पोलिस के अंमलदार ने चौकशी करने के बाद हत्यारा अमन्न मुन्ना पठाण के घर से सब्बल, चाकु, टुव्हिलर का शॉकअप राळ, ऐसे धारदार शस्त्र से मेरे लडके पर वार किये गये सभी शस्त्र मिलने के बावजुद सिर्फ एका लोखंडी रॉड दिखाया गया, और वह दोनो आरोपी को बचाने की कोशिश की जा रही है, इसलिये हमारे परिवार की अपील है की इस हत्याकांड का उच्चस्तरीय CBI के द्वारा चौकशी करने की मांग पोलिस प्रशासन और महाराष्ट्र शासन से किया गया !


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 30, 2024   

PostImage

दारू विकाल तर आता विवाह, अंत्यसंस्कारात लोक सहभागी होणार नाही


डोंगरगाववासींचा निर्णय : तंबी देऊनही गावात विकायचे दारू

 

गडचिरोली : तालुक्याच्या डोंगरगाव येथील दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. येथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी नागरिकांनी गुरुवारी एकत्र येऊन दारू बंदीचा निर्णय घेतला. व्यवसाय बंद न केल्यास विक्रेत्याची दारू नष्ट करणे, पोलिस कारवाई करणे, दारू विक्रेत्याच्या कुटुंबातील विवाह सोहळा, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कार्यक्रम व इतर कार्यक्रमात सहभागी न होणे, यासह विविध समारंभाला न जाण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

 

डोंगरगाव येथे अनेक वर्षांपासून दारूविक्री बंद होती; परंतु मागील ३ ते ४ वर्षांपासून दारूविक्री पुन्हा सुरू झाली. परिणामी, लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याने, युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. दारूविक्री बंदीसाठी गाव संघटना गठित करून दारू बंदीचा प्रयत्न केला; परंतु काही दारू विक्रेते मुजोर असल्याने दारू विक्री सुरू राहिली. यावर निर्णय घेण्यासाठी मुक्तिपथ व गाव संघटनेची बैठक पार पडली.

 

 

ग्रामपंचायतीकडून दाखलेही मिळणार नाहीत

डोंगरगाव येथे दारूविक्री सुरूच ठेवल्यास विक्रेत्यांच्या शेती कामावर न जाणे, दारू विक्री बंद न केल्यास ग्रामपंचायतीकडून मिळणारे कागदपत्र न देणे, असे कठोर निर्णय घेण्यात आले. त्यांनतर रॅली काढून व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करीत कारवाईची तंबी सुद्धा दिली.

 

सीमावर्ती भागातून दारूची वाहतूक

 डोंगरगावला लागूनच वैनगंगा नदी आहे. नदीपलीकडे चंद्रपूर जिल्ह्याची सीमा आहे. येथे देशी- विदेशी दारू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे नदीतून चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक केली जाते. या चोरट्या वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 11, 2024   

PostImage

जिल्हा हादरला ! आरोग्य केंद्राच्या शिपायाचे पाच वर्षांच्या मुलीशी कुकर्म


 

एटापल्ली तालुक्यातील घटना : डॉक्टर गैरहजर, पीडितेची हेळसांड

 

एटापल्ली : दारासमोरखेळत असलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. ९ मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास पीडित मुलगी स्वतःच्या घरासमोर खेळत होती. शेजारी आरोग्य कर्मचाऱ्यांची शासकीय निवासी वसाहत आहे.

संतोष कोंडेकर हा तिथे एकटाचराहतो. त्याने मुलीला जवळ बोलावले व घरात नेऊन तिच्याशी कुकर्म केले. हा प्रकार एका मुलीने पाहिला व घरी जाऊन सांगितला. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले; पण तिथे वैद्यकीय अधिकारीगैरहजर होते. त्यामुळे उपचारासाठी मुलीला घेऊन ते रात्री जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पोहोचले.

 

मुलीला १० मार्चला सकाळी अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. उपचारांत झालेल्या हलगर्जीवरून सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. पीडितेच्या आईच्या जबाबावरून गडचिरोली ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी प्रकरण एटापल्ली तालुक्यातील संबंधित पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचारात हलगर्जी झाली असेल तर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दावल साळवे यांनी सांगितले

 

आरोपी फरार, शोध सुरु

या घटनेनंतर आरोपी संतोष कोंडेकर फरार झाला आहे. सुरुवातीला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करणारा संतोष दोन वर्षांपासून एटापल्ली तालुक्यातील आरोग्य केंद्रात शिपाई पदावर नियुक्त आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पेंढरीचे उपअधीक्षक जगदीश पांडे यांनी  सांगितले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024   

PostImage

दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही …


गडचिरोली:- अवैध दारू तस्करांनी चक्क बैलबंडीने केली दारू तस्करी मात्र सतर्क पोलिसांनी दाखविला आपला इ़गा व बैलगाडी सह अवैध दारू असा चार लाख बाविस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे 
गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथे दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देश्याने बैलबंडीांचा दारु तस्करीकरीता वापर केल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन  आले आहे  दिनांक 27/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्कर संदिप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगाणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारुची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातुन वाहतुक करणार आहे. सदर माहितीबाबत तात्काळ वरीष्ठांना माहिती देवुन त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक गडचिरोली येथुन रवाना करण्यात आले.  

या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा टेकडा गावालगत असणा­ऱ्या नदी परीसरात सापळा रचुन त्याच्या दिशेने येणा­ऱ्या तीन बैलबंडी व पोलीसांचा कानोसा घेण्याकरीता वापरण्यात आलेल्या दुचाकीस ताब्यात घेऊन पाहणी केली असता, सदर तीन्ही बैलबंडी मध्ये मोठ्या प्रमाणात बिअर व व्हिस्की असा विदेशी दारुचा मोठा साठा दिसुन आल्याने सर्व मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.  सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकाने 50 बॉक्समधील 2,52,000/- रुपये किमतीचा विदेशी दारु साठा जप्त केला तसेच दारु तस्करीकरीता वापरण्यात आलेल्या 3 बैलगाडी व ईतर साहित्य 1,70,000/- रुपये किंमतीचा असा एकुण 4,22,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मोक्यावर जप्त करुन उप पोलीस स्टेशन बामणी येथे आरोपी नामे संदिप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापु मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम सर्व रा. टेकडा (ताला) या चार आरोपीतांना जेरबंद करुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे 
सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, चापोना/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 4, 2024   

PostImage

धानोरा येथे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त


 

धानोरा : तालुक्याच्या सोडे मार्गाने धानोरा शहरात वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने ३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:१५ वाजता फुले चौकात पकडले.

 

धानोरा तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक केली जात आहे. याबाबत महसूल प्रशासनाला तक्रारी प्राप्त होत होत्या. याच तक्रारींच्या अनुषंगाने सोडे परिसरातून वाळूची अवैध तस्करी करणारे एम.एच. ३३ व्ही. ०९६६ क्रमांकाचे ट्रॅक्टर धानोरा येथील फुले चौकात जप्त करून तहसीलकार्यालयात जमा केले.

 

 ही कारवाई धानोराचे तहसीलदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार डी. के. वाळके, तलाठी अविनाश कोडापे, कोतवाल जीवन आतला आदींनी केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 1, 2024   

PostImage

Gadchiroli news: तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या


गडचिरोली: शहरातीलबाजाराजवळील तलावात एका ४७ वर्षीय इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. दिलीप कवडू पेटकुले (रा. गोकुलनगर) असेआत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. 

 

दिलीप हा मंगळवारपासून गायब होता. त्याच्या कुटुंबीयांनी मंगळवारी सायंकाळी तो बेपत्ता असल्याची तक्रार गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. बुधवारी सायंकाळी तलाव परिसरात काम करणाऱ्यांना एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ दिलीपच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी दिलीपचा मृतदेह ओळखला. दिलीपने नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली. हे कळू शकले नाही. गडचिरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024   

PostImage

१.३७ कोटीच्या धानाचा अपहार; पाच जणांवर गुन्हा संस्थेचा अध्यक्ष, सचिव, …


 एटापल्ली : तालुक्यातील हेडरी येथीलआदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत पणन हंगाम २०२२-२३ मध्ये धान खरेदी केलेल्या व्यवहारात तब्बल १ कोटी ३७ लाख रुपयांच्या धानाची तफावत आढळली, याप्रकरणी सखोल चौकशी झाल्यानंतर आविका संस्थेचे अध्यक्ष, सचिव, तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यासह एकूण पाच जणांवर २५ जानेवारी रोजी आलदंडी पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

धानाच्या अफरातफर प्रकरणी १२ जानेवारी २०२४ रोजी आदिवासी विकास महामंडळ अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक (उच्च श्रेणी) बी. एस. बरकमकर यांनी आलदंडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर सुकू पंगाटी,सचिव किशोर पदा, केंद्र प्रमुख सुरेश पुंगाटी, मदतनीस प्रदीप दुर्गे, तसेच आदिवासी विकास महामंडळ कार्यालय अहेरीच्या प्रभारी विपणन निरीक्षक सोनाली पेंदाम यांच्याविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पाचही आरोपीविरोधात भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ अन्वये २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अशी आढळली तफावत खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये हेडरी धान खरेदी केंद्रावर ६७१५.३३ क्चिंटल म्हणजेच १२ हजार ९९८ पोती धानाचा साठा कमी आढळला, २०४० रुपये प्रतिक्विंटल दराने १ कोटी ३६ लाख ९९ हजार १७३ रुपये २० पैसे, तसेच बारदान्याचे ४ लाख २५ हजार ८१४ रुपये ४८ पैसे असे एकूण १ कोटी ४१ लाख २५ हजार ८७ रुपये ६८ पैसे एवढी तफावत आढळली.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 26, 2024   

PostImage

Gadchiroli news: सासऱ्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी जावयास जिल्हा व …


गडचिरोली - सासऱ्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी जावयास जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षाचा कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा आज २५ जानेवारी रोजी ठोठावली आहे. वैभव सखाराम गावडे रा. सिदेसुर, पो. येरकड, ता. धानोरा असे आरोपीचे नांव आहे.

 

चुडीयाल येथील हिरामण ताडाम (५५) यांची मुलगी वैभव गावडे याला दिली आहे. तो व्यसनी असल्याने हिरामण ताडाम यांनी आपल्या मुलीस माहेरी आणले. १२ सप्टेंबर २०२० रोजी ताडाम आपल्या कुटुंबासह झोपी गेलेअसता रात्री ९.३० वा. दरम्यान आरोपी दारुच्या नशेत येवुन मुलीला झोपेतून उठवुन व त्यांना मौजा सिंदेसुर येथे घेवून जातो असे म्हणत असतांना ताडाम यांनी अटकाव केला असता आरोपीने त्यांच्यावर चाकुने वार करण्याचा प्रयत्न केला व घटनास्थळावरून पळ काढला. या संदर्भात धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता आरोपीस अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले.

 

या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष नि. करमरकर यांनी आरोपीस कलम ३०७ भा.द.वी. मध्ये दोषी ठरवुन ५ वर्ष शिक्षा व ५००० रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास ६ महिने वाढीव शिक्षा सुनावली आहे.

 

सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील निलकंठ एम. भांडेकर यांनी कामकाज पाहिले


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024   

PostImage

Mulchera news: अत्याचार प्रकरण; शिक्षकाची रवानगी पोलिस कोठडीत


मूलचेरा : अकरावीच्या वर्गातशिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली जेरबंद असलेल्या शिक्षकाची २० जानेवारीला पोलिस कोठडीत रवानगी झाली. त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

मूलचेरा येथे विश्वजित मिस्त्री (३८, रा. कालीनगर, ह. मु. विवेकानंदपूर, ता. मूलचेरा) या शिक्षकावर १९ जानेवारीला बाललैंगिक अत्याचार व बलात्कारप्रकरणी गुन्हा नोंद झाला. पीडित १७ वर्षीय मुलगी शिकत असलेल्या महाविद्यालयात विश्वजित मिस्त्री हा शिक्षक आहे.

 

वर्गशिक्षक असल्याने त्याचा पीडितेशी नेहमी संपर्क असे. याचाच फायदा घेत त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यातओढले.

 

 त्यानंतर वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान, शिक्षकाच्या पत्नीने मोबाइल तपासला, तेव्हा या मुलीसोबतची चॅटिंग उघडकीस आली. यानंतर अत्याचाराला वाचा फुटली. पोलिसांनी १९ रोजी शिक्षक विश्वजित मिस्त्री यास जेरबंद केले होते. त्यास २० रोजी अहेरी सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी दिली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023   

PostImage

Gadchiroli news: चार पलट्या घेवुनही नशीब बलवत्तर म्हणून कारमधील चौघेही …


 

गडचिरोली - गडचिरोली- - चामोर्शी मार्गावरील कुरूड नजीक कारला अपघात झाल्याने गडचिरोली येथील प्लॅटीनम स्कूल व वैभव हॉटेलचे संचालक अजीज नाथाणी जखमी झाले असून कारने चार पलट्या घेवूनही नशीब बलवत्तर म्हणुन कारमधील चौघेही सुरक्षित बचावले. सदर घटना काल २९ डिसेंबर रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. अजीज नाथाणी यांच्यावर नागपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

प्राप्त माहितीनुसार अजीज नाथाणी हे आपल्या कारने शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, बंडू शनिवारे, इकबाल बुधवाणी यांच्यासह अहेरी वरून गडचिरोलीकडे येत होते. 

 

चामोर्शी येथून निघाल्यानंतर तळोधी ते कुरुडच्या मध्ये असलेल्या नदिवरील मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने नाथाणी यांनी आपली कार जुन्या पुलाच्या दिशेने वळविली. यावेळी रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने कार रस्त्याखाली उतरून कारने चार पलट्या घेतल्या. अपघात एवढा गंभीर होता की कार चकनाचूर झाली. 

 

 

यात अजीज नाथाणी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चामोर्शी तालुका शिवसेना प्रमुख पप्पी पठाण यांनी लागलीच घटनास्थळ गाठून चौघांनाही गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. नाथाणी यांना जबर दुखापत झाल्याने त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार मधील उर्वरित तिघांनाही कोणतीही दुखापत झाली नसल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023   

PostImage

Gadchiroli news: महिलांनो सावधान ! गडचिरोली आगारात महिलांचे दागीने व …


 

आंबेशिवणीला जाणाऱ्या दोन महिलांचे बसमधून पिंपळाचे पदक व १४ हजार रूपये केले लंपास 

 

गडचिरोली एसटी महामंडळाने महिलांसाठी अर्धे तिकीट केल्यापासून बस मधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या प्रचंड वाढली. याच गर्दिचा फायदा घेत चोरट्यांनी आंबेशिवणी येथे जाणाऱ्या दोन महिलांचे १४ हजार रूपये व एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पिंपळाचे पदक लंपास केले आहे. सदर घटना २७ डिसेंबर रोजी गडचिरोली बसस्थानकात मौशिखांब बसमध्ये घडली.

 

येथील लता भैसारे या आपल्या बहिणीसह काही कामानिमित्त आंबेशिवणी येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. गडचिरोली आगारात त्या बसमध्ये चढतांना चोरट्यांनी १५ ग्रॅमचे पिंपळाचे पदक वदोन्ही बहिणींच्या पर्समधून १४ हजार रूपये लंपास केले. सदर चोरीबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

 

गडचिरोली आगारात महिलांचे दागीने व पैसे चोरणारी टोळी सक्रीय असल्याचे बोलल्या जात असून गर्दित बसमध्ये चढतांना व उतरतांना महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023   

PostImage

Gadchiroli news: बहाद्दर युवकांनी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क …


गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. अशाच दोन बहाद्दर युवकांनी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या अनेक बाटल्या लपवल्याचे आढळले.

 

 

दोन आरोपी चामोर्शी येथे मोटरसायकलने दारूची वाहतूक करत होते. याची कुणकुण लागताच पोलिसांनी चामोर्शीतील जुन्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाजवळ सापळा लावून त्या दोघांना ताब्यात घेतले. बाईकच्या पेट्रोल टँकमधून एकामागोमाग एक दारूच्या बाटल्या निघतच असल्याने टँकमध्ये पेट्रोल आहे की नाही, आणि नसेल तर गाडी चालत कशी होती, असा प्रश्न उपस्थितांना पडला होता.

 

पोलिसांनी यासंदर्भात विचारले तेव्हा पेट्रोल टँक गाडीच्या डिक्कीत बनवण्यात आल्याचे दिसून आले. पेट्रोल पुरवठ्याचा पाईप तेथून इंजिनला जोडलेला होता. दारूची वाहतूक करण्यासाठी या बहाद्दरांनी लढविलेली ही शक्कल पाहून चामोर्शी ठाण्याचे पोलिसही चक्रावून गेले. बाईक आणि दारूच्या बाटल्या जप्त करून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

 

आता ३१ डिसेंबर जवळ आल्याने दारूची अनधिकृत वाहतूक वाढली आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात चामोर्शी पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. छुप्या पद्धतीने दारूची वाहतूक करणाऱ्यांचे मनसुबे साध्य होऊ नये यासाठी पोलिस दलाने देखील त्यांचे गोपनीय बातमीदार सक्रिय केले आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 23, 2023   

PostImage

Gadchiroli Crime News: पोर्ला वडधा मार्गावरील जंगल परिसरात अर्धनग्न तरुणीच्या …


गडचिरोली (Gadchiroli) : २१ डिसेंबर २०२३ ला पोर्ला वडधा मार्गावरील जंगल परिसरात एका अनोळखी मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर घटनास्थळ हे पोर्ला गावापासून दिड किलोमीटर अंतरावरील असल्याने व घटनास्थळावरील परिस्थीतीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. मृतक मुलीची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवून खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन गडचिरोली पोलीस दलासमोर होते. प्रकरणाची तिव्रता लक्षात घेवून तात्काळ अपर पोलीस अधिक्षक, कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देवून पाहाणी केली. श्वान पथक तसेच अंगुलीमुद्रा विभागातील अधिकारी यांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. परंतु, मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता चार तपास पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकिस आणण्याची विशेष जबाबदारी सोपविली.

सदर परिसरातील त्याचप्रमाणे संपूर्ण गडचिरोली य गडचिरोली लगत जिल्ह्यातील त्यांचे बातमीदारांना कार्यान्वीत करून माहिती घेत असतांना गडचिरोली शहरातील एका गोपनिय बातमीदाराने माहिती दिली की, एक मुलगी वय अंदाजे (१९) वर्ष, रा. चंद्रपूर २० डिसेंबर २०२३ रोजी पासून चंद्रपूर येथून बेपता आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पोलीस स्टेशन, रामनगर, जिल्हा चंद्रपूर येथून माहिती घेतली असता सदर मुली संदर्भात मिसींग क्रमांक १७८/२०२३ अन्वये नोंद आहे. त्यावरून तात्काळ मुलीचे नातेवाईकांना विश्वासात घेवून मृतदेहाचे फोटो दाखविले असता मृतक मुलगी ही त्यांचीच मुलगी असल्याची नातेवाईकांकडून खात्री पटली.

संबंधीत मिसींग कोठे व कशी झाली तसेच ती शेवटी कोनासोबत होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने माहिती घेतली असता सदर मुलीचे निखिल मोहुर्ले, रा. वैरागड याचेशी प्रेमसबंध असून तिला भेटण्याकरीता निखील मोहुर्ले मूल येथे गेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वैरागड येथून निखील मोहुर्ले यांस ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता त्याने प्रकरणाबाबत माहिती दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपी निखील मोहले यांस पुढिल तपासकामी गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात दिले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक कुमार चिता यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि निलेशकुमार वाघ, श्रिकांत बोईना, प्रशांत गरफडे, क्रिष्णा परचाके, दिपक लोणारे, माणिक निसार, माणिक दुधबळे, सतिष कतीवार, मनोहर तोगरवार तसेच पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, मपोउपनि विशाखा म्हेत्रे, भाऊराव बोरकर व इतर अंमलदार यांनी केली आहे.